उस्मानाबाद , दि . ०४
आदिवासी महिलांनी बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंना देशभरातील बाजारपेठ मिळवून देण्यासाठी योगदान दिल्याबद्दल महा ऑरगॅनिक रेथ्यूड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा)च्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष तथा वसुंधरा फाऊंडेशन संस्थेच्या सौ.सुरेखा जाधव यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पालघर जिल्ह्यातील भालीवली येथे विवेक रुरल सेवा समितीच्या वतीने रविवारी (दि.3) आयोजित कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सौ.सुरेखा जाधव यांना प्रशस्तित्र देऊन सत्कार करण्यात आला.
सौ.सुरेखा जाधव यांनी पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी बाबूंपासून तयार केलेल्या खुर्ची, आकाशकंदील यासारख्या वस्तूंना महाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबादसह पंजाब राज्यातील अमृतसर तसेच काश्मिर येथील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी योगदान दिले आहे. याची दखल घेऊन त्यांचा विशेष सन्मान समितीच्या वतीने करण्यात आला.
“उस्मानाबाद जिल्ह्यात बांबू शेतीकडे शेतकरी वळताना दिसत आहेत. त्यामुळे आपल्या भागातही बांबूपासून वस्तू तयार करण्यासाठी महिलांचे गट व संस्थांना प्रोत्साहित करणार आहे. त्याचबरोबर या वस्तूंना वसुंधरा फाऊंडेशनच्या माध्यमातून बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार आहे.”
सौ.सुरेखा जाधव
जिल्हाध्यक्ष, मोर्फा उस्मानाबाद