काटी ,दि . ०९ :
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मंगळवार दि. (12) रोजी सायंकाळी सात वाजता जिल्हा परिषद प्रशालेच्या भव्य प्रांगणात काटी येथील चिवरे परिवाराच्या वतीने स्व. लक्ष्मण तुकाराम चिवरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आवाजाचे जादुगार गायन सम्राट ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर यांच्या किर्तन सोहळ्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार आवाजाचे जादुगार गायन सम्राट ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर यांच्या किर्तन सोहळ्याचा लाभ काटीसह परिसरातील भाविक भक्तांनी व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन चिवरे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.