उस्मानाबाद , दि .०९ : 

शिक्षक भारती या राज्यव्यापी प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेची उस्मानाबाद जिल्हा सहविचार सभा विधान परिषदेचे शिक्षक आमदार तथा शिक्षक भारतीचे संस्थापक आमदार कपिल पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडली .
         


 मेघ मल्हार फंक्शन हॉल मध्ये (दि ८ ) रोजी संपन्न झालेल्या या सहविचार सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आ. कपिल पाटील हे होते . व्यासपीठावर प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नवनाथ गेंड, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे , प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष मधुकर गायकवाड, सचिव भरत मोरे, छात्र भारतीचे राज्य संघटक सचिन बनसोडे, राष्ट्र सेवा दलाचे बालाजी तांबे, अप्पाराव गोफणे, उस्मानाबाद शिक्षक भारतीचे सचिव बलभीम भोयटे आदी मान्यवरांची  प्रमुख उपस्थिती होती.  

 जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्या व तालुकाध्यक्ष, शिक्षक भारती संघटनेच्या सदस्यांच्या वतीने आमदार कपिल पाटील व प्रदेशाध्यक्ष नवनाथ गेंड यांचे शाल,श्रीफळ व फेटा बांधून स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविकात शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे यांनी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांच्या निवृत्तीनंतर आधार म्हणजे पेन्शन असून कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखकर व्हावे व त्यांचा निवृत्तीनंतरचा उत्पन्नाचा स्त्रोत कायम राहावा यासाठी आ. कपिल पाटील  यांनी प्रयत्न करावा अशी मागणी करीत शिक्षक भारती संघटनेचे कार्य व शिक्षकांच्या प्रश्नासाठी व शिक्षणाच्या हक्कासाठी  आ. कपिल पाटील यांनी शिक्षकांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. 


यावेळी अनेक शिक्षकांनी जुन्या पेन्शन संदर्भात आपली मतं मांडली व जुनी पेन्शन योजना आ.कपिल पाटील हेच मिळवून देऊ शकतात असा विश्वासही अनेक शिक्षकांनी बोलताना व्यक्त केला. या सहविचार सभेत जुनी पेन्शन योजना, निकश पात्र शाळांना अनुदान देणे, पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी देणे, जीपीएफ खाती सुरू करणे, वस्तीशाळा शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
   


याप्रसंगी मार्गदर्शन करताना विधान परिषदेतील शिक्षक आमदार तथा शिक्षक भारती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. कपिल पाटील यांनी देशातील शिक्षण पद्धती , शैक्षणिक समस्या पासून ते बेरोजगारी पर्यंत अनेक विषयांवर परखड मत मांडले.  पुढे बोलताना ते म्हणाले की, पुस्तके बदलून व छत्रपती शिवाजी महाराज यांचा खोटा इतिहास सर्वांसमोर मांडण्याचे कारस्थान  देशात सुरू आहे. एल.आय.सी. बॅंका यांचे खाजगीकरण करण्याचा घाट घातला जातोय.  तेव्हा  संविधानाने दिलेल्या हक्काचे संवर्धन करण्यासाठी पुढील काळात शिक्षकांनी जागरूकपणे काम करणे गरजेचे आहे. असुन कोरोना काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला . तरुणांच्या नौकऱ्यांचा प्रश्न उभा राहिला आहे. महागाईच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी जाती- धर्माचे मुद्दे उपस्थित केले जात आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जुनी पेन्शन योजना सुरु  करण्यासाठी, शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात प्रश्नांची सोडवणूक होईपर्यंत निश्चितपणे प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यापुढे अंगणवाडी,आशा कार्यकर्ती , शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी  शिक्षक भारती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या नेतृत्वाखाली संघटना बांधावी असे आवाहन केले. वस्तीशाळा शिक्षकांनी संघटीतपणे लढा दिल्यामुळे ते यशस्वी झाल्याचे सांगून यापुढे शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून वस्तीशाळा शिक्षकांनी अंगणवाडी व आशा कार्यकर्ती यांच्या प्रश्नांसाठी लढा पुकारला पाहिजे असेही आवाहन केले.
      



यावेळी  शिक्षक भारतीचे प्राथमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष नवनाथ गेंड, शिक्षक भारतीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे , प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष मधुकर गायकवाड, सचिव भरत मोरे, छात्रभारतीचे राज्य संघटक सचिन बनसोडे , राष्ट्र सेवा दलाचे बालाजी तांबे ,  बालाजी नायकल, प्रविण गुरव , भरत मोरे ,अप्पाराव गोफणे, बलभीम भोईटे,नारायण केदार, पांडुरंग पवार, नानासाहेब बोराडे, अबीद पटेल ,अनिल गाडेकर, ज्योतीराम सोनके, हरी जाधव, प्रा. गणेश कांबळे, राजकुमार साबळे ,महादेव सरवदे , बाळासाहेब उबाळे,परमेश्वर जगताप,भैरू गोरे, साहेबराव माकणीकर ,डॉ.विजय वडवेराव, तुषार सुतरावे ,सुनील चव्हाण, प्रविण गुरव, एस. डि. कांबळे, विलास साखरे, रेवनसिद्ध आंधळकर, पत्रकार उमाजी गायकवाड ,प्रतिभा लोकरे, सुनिता मस्कर ,सुरेखा कबाडे, वासंती गायकवाड, शुभदा कुलकर्णी, श्रीमती शिवकर, जी.एम.पवार, इस्माईल पठाण , अमोल गुंड ,कमलाकर शेवाळे,धनाजी डोळस ,टि.एस . जाधव, उबाळे सर आदींसह जिल्हाभरातील शिक्षक उपस्थित होते. 


 कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे यांनी तर सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण गुरव व आभार  राजेंद्र सूर्यवंशी यांनी मानले.
 
Top