काटी ,दि.१४:
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भिमनगरमधील नालंदा बुद्ध विहारात आणि काटी ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडीत, चेअरमन विक्रमसिंह देशमुख, सरपंच आदेश कोळी, सुजित हंगरगेकर, पत्रकार उमाजी गायकवाड,माजी सरपंच अशोक जाधव, दलितमित्र नंदु बनसोडे, मकरंद देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष भोलेनाथ बनसोडे, उपाध्यक्ष अप्पासाहेब बनसोडे आदी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित भिमसैनिकांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मशाल घेऊन पुढे जाण्याचा संकल्प केला. यावेळी भिमनगरमध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व नामफलकाचे उद्घघाटन करण्यात आले.
यावेळी तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडित, चेअरमन विक्रमसिंह देशमुख, सरपंच आदेश कोळी, सुजित हंगरगेकर, पत्रकार उमाजी गायकवाड, अशोक जाधव, दलितमित्र नंदु बनसोडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष भोलेनाथ बनसोडे, उपाध्यक्ष अप्पासाहेब बनसोडे, ग्रा.प. सदस्य अनिल बनसोडे, दशरथ बनसोडे, संजय महापुरे, अशोक बनसोडे, दत्ता बनसोडे,सुरज बनसोडे, जितेंद्र बनसोडे ,जुबेर शेख, चंद्रकांत काटे, विशाल बनसोडे, सचिन बनसोडे, विशाल मस्के, ग्रा.प. कर्मचारी अनिल बनसोडे, आबा काळे, अर्जुन बनसोडे,अभिषेक भोसले, दुर्योधन बनसोडे, अर्जुन साबळे, दयानंद डोळसे, संतोष तुळसे, शहाजी बनसोडे, ताई सुरते, रंजनाबाई शेरखाने, यांच्यासह आंबेडकर प्रेमी नागरिक, महिला उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दलितमित्र नंदु बनसोडे यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र बनसोडे यांनी मानले.