अणदुर ,दि.१४ : 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष व भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अणदुर ता.तुळजापूर   येथील अस्थी विहार स्थळाच्या ठिकाणी साहेबराव घुगे मित्र मंडळाच्या वतीने शंभर (१००)बालकांना डॉ. बाबासाहेबांच्या चरित्राचे पुस्तक मोफत वाटप करण्यात आले .



या कार्यक्रमाचे अतिथी म्हणून धीरज बेळंबकर हे उपस्थित होते. बुद्धवासी नारायण भागोजी कांबळे यांनी १९५६ साली मुंबई येथे बाबासाहेबांच्या अंतिम समयी उपस्थित राहून अस्थी अणदुरला   आणल्या होत्या. धीरज बेळकर हे नारायण कांबळे यांचे नातू आहेत. 
प्रारंभी अस्थी स्थळास अभिवादन करून नारायण कांबळे यांच्या प्रतिमेचे पूजन व स्वागत समारंभ घेण्यात आला.   


याप्रसंगी बोलताना धीरज बेंळककर म्हणाले की, जयंती ही नाचून करण्यापेक्षा पुस्तके वाचून साजरी करावी, जयंती साजरी करण्याच्या कल्पना आता बदलून समाजापुढे दिशा देणारे कार्यक्रम राबवले पाहिजेत. अशा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला आतापर्यंतच्या कार्यकाळात प्रथमच लाभले आहे. साहेबराव घुगे मित्र मंडळांनी स्तुत्य उपक्रम  समाजापुढे आणला असल्याचे सांगुन , अणदुर येथील अस्थी स्थळाच्या विकासासाठी स्वतःची दोन एकर जागा देण्याची घोषणा यावेळी धीरज बेळंबकर यांनी केली.


यावेळी सामाजिक कार्यकर्ते आर .एस. गायकवाड ,पत्रकार दयानंद काळुंके यांनी आपले विचार व्यक्त करताना महामानवाच्या अस्थी असणे हे आपल्या या भागाचे भाग्यच असून येथील पवित्र ठिकाण जलद गतीने विकसित झाले पाहिजे , अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.     
                                          

यानंतर उपस्थित सर्व बालकांना बाबासाहेबांच्या चरित्राचे पुस्तक व खाऊ वितरित करण्यात आला. याप्रसंगी या कार्यक्रमास शिक्षिका रेणुका डोंगरे ,अंजली जेट्टीथोर ,गुंडेशा गोवे, शाहूराज मोकाशे , अनिल अणदुरकर, राहुल राठोड, काशिनाथ घुगे, दादा जेट्टीथोर,बापु घुगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहेबराव घुगे यांनी केले. तर आभार राहुल राठोड यांनी मानले.
 
Top