तुळजापूर, दि.३०,
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
याप्रसंगी शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या विचारांशी तादात्म्य साधून दि.३०/४/२०२२ रोजी सेवानिवृत्त होणारे ग्रंथालय परिचर सुग्रीव बेळंबे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना प्रा.जे.बी.क्षीरसागर यांनी म्हणाले की,अनवरत अभ्यास करने हे तुकडोजी महाराजांचे ध्येय होते, त्यांनी आपल्या किर्तनाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची जाणीव समाजास करुन दिली.आज समाजाला नर्तनाची नव्हे तर किर्तनाची गरज आहे, त्यांनी आपल्या ग्रामगितेच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, वाईट चालीरिती यांना प्रतिबंध करण्यासाठी खुप मोठे कार्य केले, त्यांच्या मते ग्रामविकास म्हणजेच देश विकास होय.आधुनिक काळामध्ये संतांना केवळ अभिवादन करून चालणार नाही तर संतांच्या विचारांवर , आदर्शावर आपणांस चालावे लागेल तरच आपण एक सुव्यवस्थीत समाज घडवू शकतो असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी डॉ.मेजर वाय.ए.डोके, डॉ.एस. एम. देशमुख, डॉ.नेताजी काळे,प्रा.धनंजय लोंढे, प्रा.अण्णासाहेब वसेकर,प्रा.डॉ.सी.आर दापके, प्रा.सविता कदम, डॉ एफ.एम तांबोळी, कार्यालयीन अधीक्षक सुमेर कांबळे ग्रंथपाल दिपक निकाळजे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.आशपाक आतार यांनी तर आभार प्रा डॉ एम.आर.आडे यांनी मानले, कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा व्ही एच चव्हाण यांनी पुढाकार घेतला .सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. एम मणेर यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला .