जळकोट,दि.३०

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मिळालेल्या वेळेचा चांगला उपयोग करून जीवनात यशस्वी होण्याचे आवाहन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे साहय्यक  पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी  तुळजापूर तालुक्यातील  जळकोट येथे केले.


जळकोट येथील नवीपेठेतील समर्थ कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सिद्धेश्वर गोरे हे बोलत होते. या मार्गदर्शन शिबिराच्या  अध्यक्षस्थानी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते भालचंद्र पोतदार हे होते. यावेळी पत्रकार मेघराज किलजे व संजय पिसे हे उपस्थित होते.



 या शिबिराची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार समर्थ क्लासेसचे संचालक  रामशेट्टी पाटील यांनी केले.कु. नंदिनी स्वामी या विद्यार्थिनींने मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात पोतदार यांनी शिक्षणासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुसंस्कारित विद्यार्थी घडले तर गावासह देशाचा विकास होतो. त्यांनी विद्यार्थ्यांना अवांतर वाचन करण्याचे सांगितले. सिद्धेश्वर गोरे यांनी आपला पोलीस निरीक्षक पदापर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात सांगितले. जिंकण्यासाठी सतत वेळेबरोबर धावले पाहिजे. असा मंत्र त्यांनी यावेळी दिला. 
या मार्गदर्शन शिबिराचे सूत्रसंचालन कु. ऋतुजा सुरवसे व कु. आकांक्षा कागे यांनी केले. यावेळी विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.
 
Top