नळदुर्ग ,दि . ३०
शहरातील वसंतनगर येथिल तुळजाई मंडप काॕन्ट्रक्टरचे मालक अशोक रामचंद्र जाधव वय 54 यांचे शुक्रवारी संध्याकाळी निधन झाले आहे. मृत्यूचे नेमके कारण समजु शकले नाही.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, दोन मुली, नातवंडे असे परिवार आहे. ते तुळजाई मंडपचे मालक होत. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. नळदुर्ग शहर व परिसरात जाधव यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.