उस्मानाबाद , दि .२

शहारातील शांती निकेतन वसाहतीत विठाई येथे संस्कार भारतीच्यावतीने १५ वर्षापासुन दैनंदिनी मुद्रीत केली जाते. याच मराठी नववर्षाप्रमाणे दैनंदिनी २०२२ -२३ चे नवर्षाच्या मुहूर्तावर विमोचन करण्यात आले. गुढीप्रतिमासह भारतमाता प्रतिमा पुजनानंतर ध्येय गीतानी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दैनंदिनीचे विमोचन करण्यात आले.


 यावर्षी स्वाधीनता से स्वतंत्रता की ओर या राष्ट्रासाठी शहीद हुतात्म्यांचा परिचय विषयरूपी आहे . या विमोचन सोहळयास प्रमुख उपस्थिती डॉ. अरविंद देशमुख, देवगिरी प्रांत लोक कला प्रमुख डॉ. सतिश महामुनी, प्रांत चित्रकलासह प्रमुख शेषनाथ वाघ , जिल्हा प्रमुख श्याम सुंदर भन्साळी, उपाध्यक्ष पद्माकर मोकाशे  तुळजापूर अध्यक्ष प्रफुल्ल कुमार शेटे ,जिल्हा महामंत्री प्रभाकर चोराखळीकर, जिल्हा संगीत प्रमुख सुरेश वाघमारे सुंभेकर , जिल्हा कोष प्रमुख अरविंद पाटील, शहर समिती अध्यक्ष शरद वडगावकर, संगीत प्रमुख मुकुंद पाटील मेंढेकर, महादेव केसकर, सुधीर पवार  आदी उपस्थित  होते. 


प्रास्ताविकात जिल्हाप्रमुख श्यामसुंदर भन्साळी यांनी कोरोना नंतर नियम शिथील झाल्याने मोकळे झाले आकाश अशी भावना व्यक्त करित पुढील काळात संस्कार भरती समाज राष्ट्रउपयोगी उपक्रम राबणार आहे असे मनोगत व्यक्त केले .         
   आपल्या हातामध्ये असणारे कर्तव्य सक्षमपणे बजावणे, आपल्या कामामधून लोकहिताचे काम झाल्यास हीदेखील देशसेवा आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय किर्तीचे सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. अरविंद देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभम चोराखळीकर यांनी परिश्रम घेतले . सुत्रसंचालन प्रभाकर चोराखळीकर यांनी केले तर आभार अरविंद पाटील यांनी मानले .
 
Top