नळदुर्ग , दि . ०३ : विलास येडगे 

युवक काँग्रेसच्या माध्यमातुन येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष प्रत्येकाच्या घरा--घरात पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील यांनी नळदुर्ग येथे आयोजित केलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात  सांगितले .
     


  दि.१ एप्रिल रोजी नळदुर्ग येथे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील प्रदेश सचिव अभिजित चव्हाण, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, उपाध्यक्ष श्रीनिवास पाटील, तालुका अध्यक्ष अभिजीत कदम, व उपाध्यक्ष सचिन चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
      

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक मगर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन जि.प. सदस्य बाबुराव चव्हाण,धैर्यशिल पाटील, अणदुरचे सरपंच राम आलुरे, माजी जि. प.सदस्य पंडीत जोकार, मुकुंद डोंगरे, अख्तर काझी, इमाम शेख, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नवाज काझी, शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कल्पना गायकवाड, सुभद्रा मुळे,माजी नगरसेविका सुप्रिया पुराणिक, अभिजित कदम, बालाजी बंडगर, पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी गायकवाड, धनराज मुळे हरीश जाधव,दिलीप भोकरे, नगरसेवक रणजित इंगळे, रोहीत पडवळ, बालाजी मोकाशे, नवनाथ पाटील, दत्ता मस्के, रसिक वाले, निलेश रोचकरी, आबा रोचकरी, लखन पेंदे, रणजितसिंग ठाकुर आदीजण उपस्थित होते.
       


प्रारंभी काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर यावेळी नळदुर्ग शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी नगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी, शहर अध्यक्ष महेबुब शेख, अजीज जुनोदी व ताजोद्दीन शेख यांनी काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
     

  यावेळी बोलताना शरण पाटील म्हाणाले की,  आज देशाला खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या विचाराची गरज आहे. काँग्रेस पक्षच सर्वांना समान व योग्य न्याय देऊ शकतो. युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी येणाऱ्या काळात सर्व स्तरातील लोकांची सेवा करण्याचे काम करणार आहे. काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी यापुढील काळात पक्षामध्ये युवकांना जास्तीत जास्त संधी देण्यात येणार आहे असेही शरण पाटील यांनी यावेळी म्हटले.
      

 यावेळी अभिजित चव्हाण, मुकुंद डोंगरे, अशोक मगर बाबुराव चव्हाण यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भैरवनाथ कानडे यांनी केले तर आभार नगरसेवक विनायक अहंकारी यांनी मानले.
        

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नवाज काझी, नगरसेवक बसवराज धरणे, विनायक अहंकारी, अझहर जहागिरदार, इमाम शेख, सुधीर हजारे, सचिन डुकरे, दत्तात्रय कोरे, पांडुरंग पुदाले,अजय बागडे, मुजम्मील पटेल, विलास पुदाले,सतीश पुदाले , फक्रोद्दिन मुजावर, वसीम काझी यांनी परीश्रम घेतले.
       या कार्यक्रमास नळदुर्ग शहर व परीसरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते ,  सोसायटीचे चेअरमन , सरपंच , उपसरपंच , प.स. सदस्य ,  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top