काटी , दि .०३

 दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उन्हामुळे नागरिक थंडपेयकडे वळताना दिसत असुन काटी ता . तुळजापूर येथिल  बसस्थानकावर येणा-या ग्रामस्थाना भर उन्हात  थंड पाण्याची सोय व्हावी या उदात्त हेतुने  रविवारी पाणपोईचा शुभारंभ करण्यात आले आहे.


 जलसेवेच्या माध्यमातून कडक उन्हाळ्यात तहान शमविण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी अनिल गोविंद बनसोडे यांच्या वतीने भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, माजी सैनिक श्रीकांत गाटे आदी मान्यवरांच्या हस्ते या पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला.
        
अलीकडच्या काळात पाणपोईचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत असतानाच ग्रामपंचायत कर्मचारी अनिल बनसोडे यांनी तहानलेल्यासाठी गोरगरिबांचे फ्रिज समजल्या जाणाऱ्या मातीच्या डेऱ्यांमध्ये पाणपोईचा शुभारंभ करुन दिलासा दिला आहे.  यापुर्वी त्यांनी घराच्या खिडकीत प्लॅस्टिकच्या भांड्यात पाणी, अन्नधान्य ठेवून पक्षासाठी पाणी व अन्नधान्याची सोय केली आहे. या त्याच्या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
     

याप्रसंगी   पंचायत समिती सदस्य रामहरी थोरबोले,पत्रकार उमाजी गायकवाड,मकरंद देशमुख, बाळासाहेब भाले, बबन हेडे, रामेश्वर लाडुळकर, दत्तात्रय सोनवणे,नजीब काझी, अनिल बनसोडे,धनाजी गायकवाड, भोलेनाथ बनसोडे,शहाबुद्दीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top