जळकोट, दि.३ :
तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी ( नळ) येथे सदगुरु शिवराम बुवा दिंडेगावकर व मारुती महाराज कानेगावकर यांच्या कृपाशीर्वादाने दि.४ ते दि.१० एप्रिल या कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहाचे हे ५ वे वर्ष आहे. सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहात श्री ची दैनंदिन पूजा व्यंकट कुलकर्णी हे करणार आहेत तर व्यासपीठ ह.भ.प. इंद्रजीत महाराज , कास्तीकर हे सांभाळणार आहेत. या सोहळ्यात ह. भ. प. डॉ. मुंडे महाराज, अणदूर, दिपक निकम महाराज, धनगरवाडी, बली बागल महाराज , चीकुंद्रा, बाबा लोमटे महाराज, सलगरा दिवटी, शिवाजी चव्हाण, चव्हाणवाडी व काशिनाथ गर्जे महाराज माळेगाव यांचे प्रवचन तर कीर्तनासाठी ह. भ. प. बालाजी सुरवसे महाराज, कोराळ, नितिन जगताप महाराज, हिप्परगा, प्रशांत घोडके, बलसुर, मोहन पाटील महाराज , किलज , बाबा चौरे महाराज, खंडाळा व तुकाराम हजारे महाराज, बेळगाव यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
दि.१० रोजी ह. भ. प. फुलचंद रिंगणेकर महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार असून, ह. भ. प. अप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांच्या हस्ते काला वाटप होणार आहे. कीर्तनाचे आयोजन शंकर काळे, मधुकर साळुंखे, शिवाजी कदम, बाबू कृष्णा कदम यांनी केले आहे. बाहेरून आलेल्या वारकऱ्यांसाठी व गावातील मंडळीसाठी लहू कृष्णा कदम, सुभाष पवार, शंकर काळे, आप्पाराव कदम, लक्ष्मण लष्करे, शिवाजी वाघदरे, घनश्याम कदम, सिद्राम साळुंखे, यादव कदम, महादेव लष्करे, शिवाजी पवार, बळीराम कदम, दत्तात्रय पवार, बंडू लष्करे, श्रीधर पवार, रमेश कदम, पांडुरंग कदम, व्यंकट काळे व लहू नामदेव कदम ग्रामस्थ अन्नदान करणार आहेत. तरी या पारायण सप्ताहाचा भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.