काटी , दि . ३०
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शनिवार दि.30 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता येथील भीमनगरमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त भव्य अशी विश्वरत्न, महामानव आधुनिक भारताचे पाहिले कायदेमंत्री, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात, निळ्या रंगाची मुक्त उधळण व नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी करीत काढण्यात आली होती.
प्रारंभी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, कॉग्रेसचे माजी चेअरमन सयाजी देशमुख,अशोक जाधव, सुजित हंगरगेकर, उत्सव समितीचे अध्यक्ष भोलेनाथ बनसोडे, उपाध्यक्ष अप्पासाहेब बनसोडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे आधारस्तंभ मिलिंद बनसोडे, अमोल बनसोडे, ग्रा.प. सदस्य अनिल बनसोडे, संजय महापुरे, रामेश्वर लाडुळकर, करीम बेग, चंद्रकांत काटे, दत्ता बनसोडे, दशरथ बनसोडे, मनोज बनसोडे, सुरज बनसोडे, माजी उपसरपंच अशोक बनसोडे, जितेंद्र बनसोडे, धनंजय बनसोडे आदी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
शनिवारी निघालेल्या या मिरवणुकीत आकर्षक रोषणाई केलेल्या रथामध्ये बसवलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांची मुर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
मागील दोन वर्षांमध्ये कुठल्याही प्रकारचा सण-उत्सव कोरानोच्या महामारीमुळे साजरा करण्यात आला नव्हता. परंतु यावर्षी राज्य सरकारने जयंती उत्सवाला कोणताही निर्बंध लावले नव्हते.
मागील अनेक वर्षापासून येथील भिमनगरमधून महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक निघत असते .या मिरवणुकीत काटीसह परिसरातील आंबेडकर अनुयायी रेकॉर्ड तोड गर्दी करून डी.जेच्या तालावर "जय भीमचं नाव जगी गाजत"...! "भीमाचं गाणं डीजेला वाजत"...! भिमगीतावर भीमसैनिकांसह तरुणाईने बेभान होऊन नृत्यामध्ये तल्लीन होऊन भिमगीतावर ठेका धरला होता.या मिरवणुकीचा शेवट भिमनगरमध्ये करण्यात आला.