चिवरी , दि . ०१ :राजगुरू साखरे

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दि, १ मे रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 


यावेळी प्रारंभी शालेय समिती अध्यक्ष शत्रुघन बिराजदार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून मुख्याध्यापक  राजकुमार म्हेत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सहशिक्षक राहुल मसलेकर, अण्णासाहेब भोंग, मोहन राजगुरू, माजी शालेय समिती अध्यक्ष सचिन शिंदे, गोविंद शिंदे, अंगणवाडी सेविका अनिता बिराजदार, कल्पना शिंदे ,लक्ष्मी मेंढापूरे, रेश्मा चिमणे, हिरकणाबाई लोहार, उषाबाई नगदे, आदीसह विद्यार्थी उपस्थित होत.
 
Top