भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा...आस्मानाच्या सुलतानीला, जवाब देती जीभा...सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा...दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा…                

मुरुम ,दि . ०१

६२ वा महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने आयोजित मुरूमच्या श्री माधवराव पाटील महाविद्यालयात रविवारी (ता.१) रोजी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 प्रारंभी कै. माधवराव (काका) पाटील यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार तसेच महाराष्ट्राचे शिल्पकार तथा पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शरण पाटील यांनी गौरवशाली महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी-ज्यांनी प्राणाची आहुती दिली तथा बलिदान दिले या सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्ती केली. सर्व उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या. या वेळी नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, प्रा. डॉ. सतिश शेळके, माजी नगराध्यक्ष प्रदीप दिंडेगावे, सालार कोतवाल, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, राजू मुल्ला आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
 
Top