नळदुर्ग ,दि. ०१


तुळजापूर तालुक्यातील   हंगरगा (नळ) येथिल राजीव गांधी विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त  कामगारांचा सत्कार 
 एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या औचित्य  साधून राजीव गांधी विद्यालय हंगरगा नळ ता. तुळजापूर येथे कामगारांचा सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष शिवशंकर   वाघोले  तर  प्रमुख उपस्थिती म्हणून बालाघाट शिक्षण संस्थेचे  संचालक प्रकाश  चौगुले , सरपंच अतुल कलशेट्टी  , उपसरपंच दयानंद चौगुले ,प्रसिद्ध उद्योजक प्रशांत हत्ते ,माजी सैनिक शिवाजी चव्हाण, ग्राम विकास अधिकारी अनिल पाटील ,तलाठी जोगदंड यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय हंगरगा येथे कार्यरत असणाऱ्या कामगारांचा शाल ,पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन  मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


 ,विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर घोडके  यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व व माहिती विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी विद्यालयात उपयुक्त वस्तू भेट दिल्याबद्दल प्रतीक केबल ट्रे सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्याकडून कै. सिद्रमाप्पा नागप्‍पा हत्ते यांच्या स्मरणार्थ प्रशांत हत्ते यांच्याकडून विद्यालयास कॅनान प्रिंटर भेट दिल्याबद्दल त्यांचाही सत्कार  करण्यात आला.  तसेच संतोष शिवाजी चव्हाण माजी विद्यार्थी यांच्याकडून विद्यालयास प्रोजेक्ट भेट दिल्याबद्दल त्यांचे वडील तथा माजी सैनिक शिवाजी चव्हाण यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. गावातील नागरिक शरफोद्दीन पटेल  यांनी शाळेच्या मुलींसाठी स्वच्छता घरासाठी जागा दिल्याबद्दल त्यांचाही सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर विद्यालयातील इयत्ता आठवी व नववी गुणानुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आले. यावेळी माजी सरपंच मोहन कांबळे, वसंतराव अप्पशेट्टी ,  गावातील नागरिक ,युवक मित्र, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य ,उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण गुरव तर आभार प्रकाश बनसोडे  यांनी मानले.
 
Top