जळकोट , दि . ०१ 

तुळजापूर तालुक्यातील जळकोटच्या भिमनगरमध्ये  मुख्य चौकात पेवर ब्लाॅक या कामाचे भूमिपूजन  जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश‌ चव्हाण व सरपंच अशोकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.


जिल्हा परिषद अंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेतून ही निधी मंजूर करण्यात आले असून  डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दिनी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.


यावेळी सोसायटीचे चेअरमन राजु पाटील, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम, शिवसेनेचे कृष्णात मोरे, बसवराज कवठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस महेश कदम, ग्रा.प.सदस्य अंकुश लोखंडे,अरुण लोखंडे, बबन मोरे,सुनील माने ,ग्रा.प.सदस्य,कल्यानी साखरे, ग्रा.प.सदस्य जीवन कुंभार, बसवराज भोगे,प्रकाश लोखंडे,दामु लोखंडे,पिन्टु चुंगे, सिध्दार्थ लोखंडे,यलाप्पा दुपारगुड्डे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
 
Top