उस्मानाबाद ,दि . २३

 येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई केंद्र उस्मानाबाद च्या वतीने डायट कार्यालयात शनिवार दिनांक 30 रोजी सकाळी 11 वाजता काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


 दोन गटात घेण्यात येणार्‍या या स्पर्धेत शालेय गट इयत्ता बारावी पर्यंत आणि खुला गट महाविद्यालयीन सर्वांसाठी असणार आहे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कवींनी त्यांची कविता स्वरचित असावी, कवितेची लिखित टंकलिखित प्रत स्पर्धेच्या दिवशी आयोजकाकडे द्यावी, कविता सादरीकरणासाठी तीन मिनिटे वेळ देण्यात येणार आहे .कविता समाजसेवक व शेतीविषयक एकच असाव्यात कवींनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंद शुक्रवार दि. 29 रोजी सायंकाळी पाच पर्यंत करता येईल .यासाठी अरविंद हंगरगेकर 86 00333307 यांच्याशी संपर्क साधावा. यशस्वी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. शालेय गटासाठी प्रथम तीनशे रुपये द्वितीय दोनशे व तृतीय शंभर रुपये तर उत्तेजनार्थ दोन प्रत्येकी 51 रुपये महाविद्यालय व खुल्या गटासाठी प्रथम पाचशे रुपये, द्वितीय चारशे रुपये व तिथे तीनशे रुपये तर उत्तेजनार्थ दोन प्रत्येकी दीडशे रुपये रोख पारितोषक ठेवण्यात आले आहे. इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे

 
Top