जळकोट, दि.१८
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावचा दशवार्षिक सुक्ष्म नियोजन करून सर्व घटकाचा समावेश करून गावचा विकास करणे शक्य आहे. असे प्रतिपादन तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत सिंह मुरोड यांनी जळकोट येथे व्यक्त केले.
तुळजापूर तालुक्यातील जळकोट या गावची तालुक्यातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी दशवार्षिक सुक्ष्म नियोजन करून गावातील रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विविध विकास कामे करण्यासाठी निवड झाली असून, त्यासंदर्भात आराखडा कार्यशाळा पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालय यांच्या माध्यमातून आराखडा कार्यशाळा जिल्हा परिषद प्रशाला येथे पार पडली. त्यावेळी लोकप्रतिनिधी, गावातील नागरिक व विविध खात्याचे शासकीय प्रतिनिधी यांना मार्गदर्शन करताना मरोड हे बोलत होते. या योजनेतून गावचा पुढील दहा वर्षाचा आराखडा तयार करण्यात येणार असून, गाव फेरी व शिवार फेरीतून येत्या चार दिवसात गावचा पूर्णपणे सर्वे करण्यात येणार आहे. गावातील १४०२ कुटुंबांचा सर्वे करण्यात येणार आहे.२६२ रोजगार हमीच्या कामातून शेतकरी ,शेतमजूर व रोजगार हमीच्या मजुरांच्या हाताला काम देण्यात येणार आहे. विविध विकासाची कामे या आराखड्यात घेण्यात येणार आहेत. गावातील कुटुंबांना रोजगार हमी योजनेचे रोजगार पत्रक देण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण प्रशासन व ग्रामपंचायत कार्यालय कामाला लागली आहे.
या आराखडा कार्यशाळेला जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोकराव पाटील, विस्ताराधिकारी के. व्ही भांगे, जिल्हा समन्वयक शिल्पा भालकुळे, चित्रलेखा, उपसरपंचपती बसवराज कवठे,ग्रामपंचायत सदस्य प्रशांत नवगिरे, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम, महेश कदम, कृष्णात मोरे, ग्रामपंचायत सदस्य कल्याणी साखरे, नामदेव कागे, दत्तात्रय चूंगे,पत्रकार मेघराज किलजे, विविध खात्याचे शासकीय प्रतिनिधी, कृषी , महसूल , पंचायत समिती यांचे प्रतिनिधी, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी आदीजण उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्राम विकास अधिकारी जी.के. पारे यांनी केले.