तुळजापूर , दि . १९
तुळजापूर येथील वडिलांचे छत्र हरवलेल्या दिव्यांग लहान भगीनीच्या कुटुंबीयांना राहण्यासाठी योग्य निवारा नसल्याने तुळजापूर प्रहार दिव्यांग संघटनेच्यावतीने घर बांधून देण्यात येणार आहे.
घर बांधून देण्याच्या कामाचे( दि. 19 )एप्रिल 2022 रोजी सकाळी अकरा वाजता सदरील दिव्यांग कुटुंबाच्या घरी जाऊन उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष मयुर काकडे व सामाजिक वनीकरण विभागाचे मनोहर पुंड यांच्या हस्ते श्रीफळ वाढून भूमिपूजन करण्यात आले. हा स्तुत्य उपक्रम तुळजापूर प्रहारचे तालुकाध्यक्ष शशिकांत मुळे, तुळजापूर शहराध्यक्ष नागेश कुलकर्णी यांच्या वतीने घेण्यात आले आहे.
तुळजापूर शहरातील दिव्यांग मुलीस छत्र छायेचा दिला आधार आशा आशियाने प्रहार क्रांती आंदोलन संघटनेचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या मातोश्री कै इंदिरा माई बाबाराव कडू यांच्या स्मरणार्थ तुळजापूर तालुका प्रहार संघटनेच्या वतीने तुळजापूर शहरातील वासुदेव गल्ली येथील कु योगीता राजेश इटकर या लहान दिव्यांग भगिनीच्या कुटुंबाचे घर बांधून देण्याचे आश्वासन पूर्णत्वाकडे नेण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष मयुर काकडे, सामाजिक वनीकरण विभागाचे वन अधिकारी मनोहर पुंड, विनोद कदम, तुळजापूर तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष शशिकांत मुळे, तालुका उपाध्यक्ष शशिकांत गायकवाड, तालुका संघटक सचिन शिंदे, शहर अध्यक्ष नागेश कुलकर्णी, दशरथ भाकरे, अभिमान सगट ,पांडुरंग नाईकवाडी आदी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.