वागदरी ,दि. ६
येडोळा ता.तुळजापूर येथील निवृत्त मुख्याध्यापक प्रल्हाद लिंबाजी लोंढे यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी, सुना जावाई, नातु ,नातसुना,परतोंड असा परिवार आहे. दि.०६ एप्रिल रोजी येडोळा येथे त्यांच्या पार्थिवावर बौद्ध धम्म संस्कारानुसार अंतिम संस्कार करण्यात आला.
दिवंगत प्रल्हाद लोंढे गुरुजी हे जि.प. उस्मानाबादच्या शिक्षण विभागात शिक्षक म्हणून प्रामाणिक पणे सेवा करून अनेक पिढ्या घडविण्याचे कार्य केले. नोकरी करत करत ते आंबेडकरी चळवळीत सहभागी होते.
त्यांच्या निधनाने एका मनमिळावू व्यक्तीमत्वाला आपण पोरके झालो आहोत अशा भावपूर्ण शब्दात उपस्थितानी त्यांना श्रद्धांजली वाहीली .