तुळजापूर , दि . ०४
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने भाविक भक्ताना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत विविध मागण्याचे निवेदन आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आले आहे.
निवेदनात नमुद केले आहे की, सध्या अस्तित्वात असलेली पास यंत्रणा केवळ सशुल्क दर्शनासाठी ठेवण्यात यावी, तसेच सशुल्क दर्शन वितरण केंद्र मुख्य मंदिर परिसरातही उभे करून भाविकांची सोय करावी सर्व आम नागरिकांना साठी, व श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी वृद्ध व आजारी भाविक येत असतात त्या वृद्ध व आजारी भाविकांना श्री तुळजाभवानी मंदिरा मध्ये जाण्याचा मार्ग टोळ भैरव येथील दरवाजा उघडा होता,परंतु सध्या तेथील टोळ भैरव दरवाजा बंद केलेला आहे. त्यामुळे वृद्ध व आजारी भाविक भक्ताकरिता मंदिरामध्ये दर्शन घेण्यास जाण्यासाठी जिकरीचे व अवघड होत आहे, तरी वृद्ध व आजारी भाविकांना श्री तुळजाभवानी मंदिरमध्ये जाण्याचा मार्ग टोळ भैरव येथील दरवाजा उघडावा या मागणीसाठी अम आदमी पार्टीच्या वतीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान व्यवस्थापक नागेश शितोळे यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनावर तुळजापूर तालुका अध्यक्ष मधुकर शेळके, शहराध्यक्ष प्रशांत इंगळे, विनायक सरवदे, विकास घोडके ,रोहित शेंडगे ,सचिन टोले,विनोद कदम ,शिवाजी पवार ,गणेश इंगळे ,
जनक इंगळे , संदिप इंगळे, दत्ता सोमाजी, तुकाराम ढेरे, गणेश पवार ,पृथ्वीराज परदेशी, ओंकार नायकर , अनिल भोसले, विशाल टोले, सुनिल औटी ,नागनाथ इंगळे ,अतुल टोले' कुमार टोले आदींच्या स्वाक्षरी आहेत.