जळकोट, दि.२३ : मेघराज किलजे 

येथून जवळच असलेल्या आष्टा( कासार) ता. तुळजापूर  येथे शेतकरी दयानंद पाटील यांच्या मळ्यात सेंद्रिय शेती कशी करावी,गांडूळ खत निर्मिती,कंपोस्ट खते, हिरवळीचे खते,सेंद्रिय खते,जीवामृत,पंचगव्य, बीजामृत,वर्मीवाश, अमृतपाणी,नत्र,स्फुरद अशी सेंद्रिय जैविके कशी तयार करावीत व वापरण्याचे सखोल मार्गदर्शन डॉ.आश्रुबा जाधव , डॉ.आरबाड , शेतकरी आप्पासाहेब नावाडे यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

 
 कृषि सहाय्यक सचिन पवार यांनी खरीप पेरणीपूर्व तयारी व घरगुती बियाणेच पेरावे, एमआरयईजीएस फळबाग लागवड,गांडूळ खत युनिट,महाडीबीटी ऑनलाईन अर्ज .गटशेतीने शेती कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले.डॉ. आश्रुबा जाधव  प्रत्यक्ष कृतितुन रसायने तयार करुन दाखवली. तसेच सेंद्रिय शेती कार्यक्रम नोंदणीचे मार्गदर्शन एडीएमचे अधिकारी विनोद पवार यांनी केले.


या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुकेश मुळे यांनी केले.यावेळी उपसरपंच वसंतराव सुलतानपूरे ,प्रगतशील शेतकरी गुंडेराव शिंदे, सयाजी शिंदे, गहिनीनाथ कागे,व्यंकट चौधरी,गंगाधर बलसुरे, शहाजी सोमवंशी,रवी शिदोरे, काशिनाथ घोडके , बहुसंख्य शेतकरी हजर होते.आसपासच्या परिसरातून आलेले काही शेतकरी मारुतीराव शिंदे कुन्सावळी व सहकारी, रुईभरहुन जाधव व त्याचे सहकारी हजर होते.हा कार्यक्रम एकदम सुंदररीत्या संपन्न करण्यासाठी सेंद्रिय शेती गटाचे कार्यकर्ते सिद्राम तडकले , तानाजी कागे, राहुल कोरे,अमोल बचाटे, सोनू कासार,दयानंद पाटील, योगीराज कुडूकले,दत्तात्रय कागे,रतन आल्लीसे, जिनेंद्र कासार व सेंद्रिय शेती गटाचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.आभार तानाजी कागे यांनी मांडले.
 
Top