काटी , उमाजी गायकवाड

 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील  बरतर काझी यांचे चिरंजीव सय्यद सुजातअली काझी यांनी जीवनात यशाची शिखरे गाठण्यासाठी स्वप्ने उराशी बाळगून त्या दिशेने झेपावण्यासाठी खडतर, कौतुकास्पद व प्रेरणादायी प्रवास करीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत 34 व्या रॅंकने उत्तीर्ण होऊन जलसंधारण विभागात राजपत्रित अधिकारी म्हणून  यश मिळविले..
       

 काझी यांनी सोलापूर येथील सिंहगड कॉलेज मधून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये बीई पर्यंतचे शिक्षण घेतले तर वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,सांगली मधून एमटेक (स्ट्रक्चरल अभियांत्रिकी) पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. यापुर्वी त्यांनी आरआरबी परिक्षेत यश मिळविले असून ते सध्या भारतीय रेल्वे मध्ये ज्युनिअर इंजिनिअर म्हणून डिझाईन ड्राविंग ॲन्ड इस्टीमेशन या पदावर कार्यरत आहेत. 


त्यांनी जिद्द, परिश्रम व तल्लख बुध्दीमत्तेच्या जोरावर 2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 34 व्या रॅंकने उत्तीर्ण होऊन जलसंधारण विभागात जलसंधारण अधिकारी (राजपत्रित अधिकारी) या पदावर निवड झाली आहे.  या त्याच्या यशाबद्दल काटीसह परिसरातून  अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 
Top