काटी ,दि . २० 


श्रीक्षेत्र अरण विकासासाठी आणि माळी समाजाच्या हित आणि अस्मितेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी माळी समाजाचा भव्य मेळावा दि.30 एप्रिल रोजी दुपारी 12:30 वाजता श्रीक्षेत्र अरण (ता.माढा.जि.सोलापूर) येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यासाठी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी तुळजापूर येथून आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन प्रारंभ केला आहे.

 तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी, सावरगाव, मंगरुळ, काटगाव, देवकुरुळी,अपसिंगा आदी गावांना गावभेटी देऊन तिर्थक्षेत्र अरण येथील माळी समाजाच्या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या गावभेटी दौऱ्यात कल्याण आखाडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हा मेळावा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्यासह  सावता परिषदेच्या संयोजनाखाली पार पडणार आहे. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री  अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री  छगनराव भुजबळ, सामाजिक न्याय मंत्री  धनंजय मुंडे, पालकमंत्री दत्ता  भरणे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली पाटील आदी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. 
  

 या मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे,असे आवाहन संयोजकांच्या वतीने सावता परिषदेच्या संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी केले आहे.या दौऱ्याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी येवारे,सावता परिषद जिल्हा युवा अध्यक्ष बाळासाहेब भाले,जिल्हा उपाध्यक्ष महादेव माळी,महेश माळी,श्रीराम भोजने, सोमनाथ भोजने, सुनील माळी,अमोल भोजने,अजय माळी, महादेव माळी(पैलवान), हनुमंत माळी, प्रशांत माळी,अंबादास माळी, चेतन माळी,मनोज माळी,विक्रम हजारे,मुकेश हजारे,मारुती रोकडे , तामलवाडीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर माळी, बाळासाहेब डोके, शाहू माळी, समाधान डोके,जगनाथ माळी, चंद्रकांत माळी, रामेश्वर माळी, बाळासाहेब चिकलकर,किशोर माळी, विशाल माळी, कानिफनाथ माळी,सुरेश बनकर,राजू  गोरे,राहुल गोरे,आदी समाज बांधव  उपस्थित होते.
 
Top