तुळजापूर ,दि . २० : 


  तुळजापूर  तालुक्यातील  जि.प.प्रा.शाळा, वडाचा तांडा येथे मंगळवारी शाळापूर्व तयारी मेळाव्यानिमित्त प्रथमत: गावामध्ये शाळा प्रवेश दिंडीसह ढोल-ताशाच्या गजरामध्ये  घोषणा देत प्रभात फेरी काढून वातावरण निर्मिती व पालकांचे प्रबोधन, तसेच शाळा पूर्व तयारी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. 


कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता पहिली प्रवेश पात्र विद्यार्थी व पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक  भोसले बालाजी  यांनी केले. त्यानंतर इयत्ता पहिली प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या किट बद्दल प्रात्यक्षिकासह इत्यंभूत माहिती  कदम  यांनी दिली  व पालकांनी प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करून घेण्याचे आवाहन केले.


शेवटी अल्पोपहार व खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  आबासाहेब गंगथडे  यांनी केले. या कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख  अंगुले  व जळकोट बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी  सर्जे  यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सरपंच सौ. विजया चव्हाण,उपसरपंच  निमबाई राठोड, शा. व्य.स. अध्यक्ष  जयराम राठोड, उपाध्यक्ष , गोविंद राठोड, ग्रा. पं. सदस्य  लखन  चव्हाण, सौ चांगुणा चव्हाण, सौ बबिता चव्हाण,अंगणवाडी सेविका सौ.सुर्यवंशी, शिक्षण प्रेमी  सुनील जाधव,विकास चव्हाण,विजय चव्हाण,बापूराव राठोड,खेमा चव्हाण,गणेश चव्हाण,पृथ्वीराज चव्हाण आदीसह  पालक उपस्थित होते.
 
Top