अणदूर , दि . २०
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे ,या कार्यक्रमास,नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शरणप्पा कबाडे यांनी केले आहे.
20 एप्रिल बुधवारी सायंकाळी सहा वाजता खुदावाडी येथे धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन चेअरमन बापूराव पाटील, जिल्हा बँकेचे नूतन संचालक सुनील चव्हाण, नूतन युवक, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष,शरण पाटील, नूतन युवक काँग्रेस प्रदेश सचिव अभिजित चव्हाण, अनंत चव्हाण, तसेच शासकीय आरोग्य सेवा समितीवर निवड झाल्याप्रीत्यर्थ डॉ. शशिकांत अहंकारी, आदी मान्यवरांचा खुदावाडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असून, सदरील कार्यक्रमास माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील,धीरज पाटील, बाबुराव चव्हाण, रामचंद्र आलूरे,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत,
सदरील कार्यक्रमास खुदावाडी व परिसरातील जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन शरणप्पा कबाडे यांनी केले आहे