नळदुर्ग ,दि . २१ : 

ब्राम्हण समाजाविषयी वक्तव्य केल्याने समाजात तेढ निर्माण होवुन भावना दुखावल्या असुन याप्रकरणी कारवाई करण्याची तक्रार   पेशवा युवा संघटनचे तालुकाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी यांनी  उस्मानाबाद पोलिस अधीक्षक यांच्याकड़े केली आहे.


निवेदनात नमुद केले आहे की,  आमदार अमोल मिटकरी यांनी  ब्राह्मण समाजाविषयी सातत्याने गरळ ओकण्याचे काम केल्याचे आरोप करुन आमदारकी मिळावी व आहे ती शाबूत राहावी, यासाठी हा केविलवाना प्रयत्न करत आहेत.परंतु हिंदू धर्म संस्कृतीचा सतत अवमान करत ब्राह्मण समाजाला टार्गेट करत,आपण किती हुशार आहोत हे सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. परंतु दोन श्लोक आणि स्तोत्र पाठ केल्याने विद्वत्ता सिद्ध होत नसते, यांची जाणीव त्यांना कदाचित नसावी. समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य सातत्याने मिटकरी यांच्याकडून होत असल्याने   ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी पेशवा युवा संघटनचे तालुकाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी यांनी  उस्मानाबाद पोलिस अधीक्षक यांच्याकड़े केली आहे.
 
Top