अणदूर , दि . २१
वात्सल्य सामाजिक संस्था व घूगे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय भुजंगराव घुगे यांच्या जयंतीदिनी मौजे लोहारवाडी येथे दि-20-4-22 रोजी महिला विशेष आरोग्य शिबिर संपन्न झाले.
या आरोग्य शिबिराचा लाभ लोहारवाडी गावातील सर्व महिलांनी घेतला.यात प्रामुख्याने महिलांच्या संबंधित सर्व आजारावरील तपासणी व उपचार केले,हिमोग्लोबिनची तपासणी व मोफत औषधाचा पुरवठा केला.आणि गंभीर आजारावरील महिलांना शोधून त्यांना पुढील उपचाराची व्यवस्थाही केली आहे.
शिबिराचे उद्घाटन श्रीमती.संजीवनी आलूरे, लोहारवाडीच्या सरपंच श्रीमती छाया लोहार,श्रीमंत घुगे,डॅा.जयश्री मुंडे,डॅा.रूपाली कानडे,यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरासाठी डॉ. रूपाली कानडे,डॉ.जयश्री मुंडे,डॅा.नागनाथ कुंभार,डॅा.हरिदास मुंडे,शासकीस आरोग्य केन्द्र अणदूर,यांनी आरोग्य सेवा दिली,श्री.संजय पवार यांनी सर्व महिलांची हिमोग्लोबीन चाचणी मोफत करून दिली.प्रशांत संकपाळ,डॅा.प्रमोद घुगे,डॅा.नित्यानंद कुंभार, अजय अणदूरकर,जिल्हा परिषद सदस्य बाबुराव चव्हाण, यांनी सर्व आजारांवरील औषधांची विनामुल्य सोय करून मोलाचे सहकार्य केले.
या शिबिरात बाबुराव मुळे, करबस धमूरे, बसवराज नरे, लक्ष्मण दुपारगुडे यांनी सदिच्छा भेट दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वात्सल्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती प्रणीता शेटकार,प्रस्तावना अनिल घुगे,पाहुण्यांचे स्वागत सौ.शालीनी घुगे यांनी केले.
शिबिराच्या यशस्वितेसाठी चंद्रकात लोहार, मधुकर घुगे,लक्ष्मण लोहार मित्रमंडळ,वात्सल्य सामाजिक संस्था व घूगे परिवाराने परिश्रम घेतले.