अणदूर , दि . २१: अजय अणदूरकर
"जिल्हा बँकेचं लायसन रद्द होण्याची वेळ आली होती. आम्ही सर्वांनी मिळून निवडणुकीत भाग घेतला. लोकांनी सहकार्य केलं. उस्मानाबाद जिल्हा बँकेतील संचालक मंडळ व लोकांच्या कामामुळ परत जिल्हा बँकेला गतवैभव प्राप्त करणारच". अशी प्रतिक्रिया काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांनी बोलताना संबोधित केलं
उस्मानाबाद जिल्हा बँकेचे नुतन चेअरमनपदी बापूराव पाटील तर काँग्रेस पार्टीचे प्रदेश सेक्रेटरी सुनिल चव्हाण आदीसह दिग्गज नेत्यांची काँग्रेस पक्षाच्या विविध पदावर वर्णी लागल्याबद्दल खुदावाडी ग्रामस्थांच्यावतीने जंगी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावरून बोलताना माजी मंत्री बसवराज पाटील हे बोलत होते.
या सत्कार समारंभ सोहळ्यास राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण , काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुतन निवडी झालेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपिठावर जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण , अणदुर ग्रामपंचायतीचे सरपंच रामचंद्र आलुरे , हरिष जाधव, दिलीप सोमवंशी, संजय राठोड सह मान्यवराची उपस्थिती होती. .यावेळी सत्कारमुर्ती उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नूतन चेअरमन बापूराव पाटील , जिल्हा बँकेचे नूतन संचालक तथा काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील चव्हाण, नुतन युवक काँग्रेस प्रदेश सचिव अभिजीत चव्हाण , आदी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची नुतन निवडी झाल्याबद्दल तसेच शासकीय आरोग्य सेवा समितीवर डॉ. शशिकांत अहंकारी यांची देखील निवड झाल्याने खुदावाडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आले आहे .
याप्रसंगी समाजसेवक डॉ सिद्रामप्पा खजुरे , तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवाप्पा जवळगे ,शरणाप्पा कबाडे , अमर नरवडे , ग्रामपंचायत सदस्य सावंत पवार, राम जवळगे , बब्रुवान नरवडे , गुरुनाथ कबाडे , पोलिस पाटील बसवेश्वर सागवे , पत्रकार भैरवनाथ कानडे सह काँग्रेसचे कार्यकर्ते ग्रामस्थ युवक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खुदावाडी येथील युवा नेते शरणाप्पा कबाडे युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले .