वागदरी , दि . २२ :
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर शहरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्याच्या व पुतळा परिसराचे सुशोभिकरण करण्याच्या कामाला नुकतीच प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून संबंधित न.प.ने तुळजापूर प्राधिकरण विकास अंतर्गत सदर कामाच्या आँनलाईन निविदा मागविल्या आहेत.त्यामुळे रिपाइं (आठवले) कार्यकर्त्यांसह आंबेडकरी अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तुळजापूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा बसवावा या मागणीसाठी रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे, जेष्ठ कार्यकर्ते रविंद्र कदम, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड,तुळजापूर विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम,तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम, आप्पा कदम,तानाजी डावरे, महदेव सोनवणे, चंचल कदम आदीसह कार्यकर्त्यांनी रिपाइंच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून मोर्चे, निदर्शने, रास्ता रोको,लाक्षणिक उपोषण, अमरण उपोषण वगैरे आंदोलन करून पाठपुरावा केला होता.
अखेर रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले, माजी मंत्री आविनाश महातेकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, साहित्यिक वैभव काळखैरे,आदीनी मंत्रालयीन पातळीवर, तर जिल्हाधिकारी उस्मानाबाद, मुख्याधिकारी न.प.तुळजापूर, विनोद गंगणे,नगराध्यक्ष सचिन रोचकरी,नगरसेविका वैशाली कदम,हेमा कदम, नगरसेवक किशोर साठेसह सर्व नगरसेवकांनी स्थानिक पातळीवर केलेल्या सामुहिक प्रयत्नातून सदर कामाला मंजुरी मिळाली असून लवकरच तुळजापूर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.