नळदुर्ग , दि. ०९
रामतीर्थ (नळदुर्ग) येथील श्री क्षेत्र रामतीर्थ देवस्थान येथे रविवारी होणा-या भव्य श्री राम जन्मोत्सव सोहळयासाठी सज्ज झाले आहे. श्री क्षेत्र रामतीर्थ देवस्थान येथे देवस्थानचे महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांच्या आधिपत्याखाली गेल्या कांही दिवसापासुन जय्यत तयारी करण्यात येत आहे. श्रीराम नवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असुन याचा रामभक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
रामतीर्थ (नळदुर्ग) जि . उस्मानाबाद येथील श्री क्षेत्र रामतीर्थ या पावन भुमीत रविवार दि. १० एप्रिल रोजी साजरा होत असलेल्या श्री राम जन्मोत्सव सोहळयाचे औचित्य साधुन गेल्या कांही दिवसापासुन महंत श्री विष्णु शर्मा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व रामभक्तांच्या सहकार्याने जोरदार तयारी करण्यात येत आहे. मंदिर परिसरात असलेल्या पुरातन ध्यानमंदिराची रंगरंगोटी , महादेव मंदिर व कार्यालयाचे सुशोभिकरण , वीज जोडणी, मंदिर परिसराची साफसफाई, , रामकुंड,प्रवेशव्दार , वक्ष , आदीची रंगरंगोटी करण्यात आली आहे.त्याचबरोबर नळदुर्ग नगरपालिकेच्या सफाई कामगाराकडुन वेळोवेळी स्वछता करण्यात येत आहे.
श्री राम जन्मोत्सव सोहळयासाठी भव्य मंडप उभारण्यात आला असुन मंदिरावर अकर्षक विधुत रोषणाई करण्यात आली आहे. बहुतांश भक्तानी रोख रक्कम व धान्यासह इतर साहित्य सेवा म्हणुन दिली आहे.याठिकाणी अणदुर , जळकोट , रामतिर्थ , येडोळा , लोहगाव , नळदुर्ग शहरातील व परिसरातील भक्त स्वईच्छने सेवा देतात.
आज शनिवार दि.९ एप्रिल रोजी दुर्गाष्टमीचे हवन होवुन रात्रीभर भजन, कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे. त्याचबरोबर रात्री १२ वाजता महाआरती व श्रीराम शृंगार हा कार्यक्रम होईल. दि.१० एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता 108 रामभक्ताच्यावतीने पवित्र असणाऱ्या रामकुंड येथील जल आणुन जलकलश अभिषेक व श्रीराम शृंगार करण्यात येणार आहे. तसेच दुपारी १२ वा. श्रीराम जन्मोत्सव व पुष्पवृष्टी हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते ४ या कालावधीत उपस्थित रामभक्तांना महाप्रसाद देण्यात येणार आहे.
श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानंतर दि.१५ व १६ एप्रिल २०२२ या कालावधीत याठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.दि.१५ एप्रिल रोजी रात्री ८ वा.भजन व संध्या जागरण हा कार्यक्रम होणार आहे. तसेच दि.१६ एप्रिल रोजी सकाळी ११ वा.सार्वजनिक हनुमान चालिसा पठण व महाआरती तसेच दुपारी १२ ते ४ यावेळेत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.रात्री ८ वा."सुंदरकांड" व आरती असे कार्यक्रम होणार आहेत.दरम्यान येथे नळदुर्ग , अणदुर , नंदगाव येथुन पालखीचे आगमन होणार आहे.
महंत विष्णू प्रसाद शर्मा महाराज
श्री क्षेत्र रामतीर्थ (नळदुर्ग ) देवस्थान
प्रभु रामचंद्र वनवास गमन करीत असताना नळदुर्ग (रामतीर्थ ) येथे आल्याचा रामायणात उल्लेख असुन हे मंदिर एक हजार वर्षापूर्वीचे प्रचीन मंदिर आहे.
आतापर्यंत सलग ४९१ रामायण झाले.
१००८ अखंड रामायण करण्याचा संकल्प आहे.
येथे प्राचीन रामकुंड - प्राचीन रामकुंड हे अतीशय पवित्र व श्री प्रभु रामचंद्रांनी याठिकाणी वास्तव्यास असताना तहान लागल्यानंतर बाण मारून याठिकाणी पाणी निर्माण केले त्यालाच पुढे रामकुंड म्हणुन ओळखण्यात येऊ लागले.या रामकुंडतील पाणी भाविक भक्त तिर्थ म्हणुन घरी घेवुन जातात. याठिकाणी देशभरातुन भक्त येतात.