काटी ,दि . २४
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी शनिवार दि. 23 रोजी कालाष्टमी निमित्त येथील ब्राह्मण गल्लीतील भैरवनाथ मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रम घेत भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या भैरवनाथ जोगेश्वरीचा शाही विवाह सोहळा अनेक भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या मंगलमय शाही विवाह सोहळ्यानिमित्त ब्राह्मण समाजातील तरुणांनी एकत्रित येऊन भैरवनाथ मंदीराचा नव्याने जिर्णोद्धार केलेल्या मंदीरात आकर्षक फुलांची सजावट आणि मंदीर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी संयोजन समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच जिर्णोद्धार झालेल्या मंदीरापुढील सभा मंडपाचे काम अपुर्ण असल्याने उपस्थित मान्यवरांसह ग्रामस्थांना सभा मंडपाचे काम पुर्णत्वाकडे नेण्यासाठी संयोजन समितीच्या वतीने मदतीचे आवाहन केले.
कालाष्टमी निमित्त शनिवारी सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले . या सोहळ्यानिमित्त रात्री सोलापूरातील वेणुगोपाल संगीत विद्यालयातील विद्यार्थीनी कु मयुरी दत्तप्रसाद कुलकर्णी हिने "कौशल्याचा राम" तर पियुष आवारे यांनी "सुर निरागस" हे सुंदर गीत गात वाहवा मिळवली तर आदीती कुलकर्णी, चि. सार्थक बावीकर, वैष्णवी व्हनखडे, जयेश कुलकर्णी, शर्वरी कुलकर्णी, झंकार कुलकर्णी, रुपक कुलकर्णी आदींनी तबला, पेटी, बासरीने या गीतांना अप्रतिम साथ दिली. तर सोलापूर येथील जानकी भजनी मंडळाने उत्कृष्ट भारुडाचे सादरीकरण करीत अध्यात्मिकतेसोबतच व्यक्तिमत्व विकासाकडे वाटचाल करताना सामाजिक विकासाचे भान ठेवून या महिला भजनी मंडळाने भारुडाच्या कार्यक्रमातून लोकांचे मनोरंजन करून समाज प्रबोधन करीत अतिशय दर्जेदार व सुरेख भारुडाचा कार्यक्रम केला. रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान हा पारंपारिक विवाह सोहळा थाटात पार पडला.विवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. हा भैरवनाथ जोगेश्वरी विवाहसोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशांत काटीकर, आनंद काटीकर, दत्तप्रसाद कुलकर्णी, राजाभाऊ कुलकर्णी, पांडुरंग कुलकर्णी, प्रमोद कुलकर्णी, विलास कुलकर्णी, सुहास सखाहरी, कुलकर्णी, पिंटू कुलकर्णी, नंदकुमार कुलकर्णी, अतुल सराफ, संतोष कुलकर्णी, सुहास सुरेश कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, बाळासाहेब कुलकर्णी, सतिश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, विजयकुमार कुलकर्णी, दिपक कुलकर्णी आदींनी पुढाकार घेतले.