नळदुर्ग , दि . ११: विलास येडगे
उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग शहराच्या पुर्व दिशेला असलेल्या श्री क्षेञ रामतीर्थ हे प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले असुन लवकरच हे तिर्थक्षेञ जगासमोर येणार आहे. येथिल मंदिर व परिसराची नुकतेच चिञीकरण करण्यात आले आहे.
Pwan's Don't Line Chess Media Private Limited निर्मित आणि अँप्लॉज यंटरटेनमेंट द्वारा तयार करण्यात येत असलेल्या "फाईंडिंग राम--इन द फुटस्टेप ऑफ राम"याचे चित्रीकरण दि.९ मे रोजी नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ येथे करण्यात आले.
अभिनेता अपारशक्ती खुराणा हे अयोध्या ते श्रीलंका या मार्गावर जिथे, जिथे श्री प्रभु रामचंद्र वनवास गमन काळात गेले आहेत त्या, त्या ठिकाणी जाऊन त्याचे चित्रीकरण करून त्यावर डॉक्युमेंट्री बनवित आहेत. नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ येथे वनवास गमन काळात श्री प्रभु रामचंद्र दोन वेळेस येऊन गेले आहेत.त्यामुळे अपारशक्ती खुराणा यांनी दि.९ मे रोजी श्री क्षेत्र रामतीर्थ येथे येऊन मंदिर व परीसरात चित्रीकरण केले.
यावेळी श्री क्षेत्र रामतीर्थ देवस्थानचे महाराज श्री विष्णु प्रसाद शर्मा महाराज यांनी चित्रीकरणाच्यावेळी अभिनेता अपारशक्ती खुरणा यांना मंदिराची संपुर्ण माहिती सांगितली. यावेळी मंदिर देवस्थानचे सचिन डुकरे, ऍड. धनंजय धरणे, प्रभाकर घोडके, रोहित मोटे आदीजन उपस्थित होते.
नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ येथे श्री प्रभु रामचंद्र येऊन गेल्याचा उल्लेख इतिहासात आहे.याचा शोध घेत अपारशक्ती खुराणा हे नळदुर्ग येथील श्री क्षेत्र रामतीर्थ येथे आले होते. अयोध्या ते श्रीलंका या मार्गात ज्या, ज्या ठिकाणी वनवास गमन काळात श्री प्रभु रामचंद्र गेले त्या, त्या ठिकाणचे चित्रीकरण करून यावर अपारशक्ती खुराणा हे"फाईंडिंग राम--इन द फुटस्टेप ऑफ राम"(रामायण) वर डॉक्युमेंटरी बनविणार आहेत.
यामुळे या पवित्र स्थळांची माहिती जगासमोर येणार आहे. त्यामुळे भविष्यात श्री क्षेत्र रामतीर्थ देवस्थानला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. श्री क्षेत्र रामतीर्थ हे श्री प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्री क्षेत्र आहे. सध्या महंत श्री विष्णु शर्मा महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांमुळे मंदिरात विविध विकास कामे होत आहेत. त्यामुळे या क्षेत्राचा कायापालट झाला आहे. भविष्यात हे श्री क्षेत्र एक मोठे तीर्थक्षेत्र म्हणुन नावारूपाला येण्याची शक्यता आहे.