नळदुर्ग ,दि . १०
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील ज्ञानकिरण बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यस्तरीय महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार वितरण व भैरवनाथ कानडे लिखित "ओळख थोरांची " पुस्तक प्रकाशन समारंभ नळदुर्ग येथे दि . ( ११ ) रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
नळदुर्ग येथील एस. के .फंक्शन हॉल येथे सकाळी ११ वा. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या शुभहस्ते सदर पुरस्कार वितरण व पुस्तक प्रकाशन समारंभ होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर ,अप्पर पोलीस अधीक्षक नवनीतकुमार काँवत , जि.प. सदस्य बाबुराव चव्हाण दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे ,तहसीलदार सौदागर तांदळे , जि.प सदस्य प्रकाश चव्हाण,सोलापूरच्या माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नसीमा पठाण , उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे, सपोनि सिद्धेश्वर गोरे , शब्दवेध बुक हाऊसचे प्रकाशक वैजनाथ वाघमारे आदि उपस्थित राहणार आहेत .
यावेळी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे स. कुलसचिव डॉ. शिवाजीराव शिंदे ( सोलापूर ) सौ .अर्चना पानारी (कोल्हापूर ) ,प्रेमचंद अहिरराव (धुळे ), माधव गरड (उस्मानाबाद, ) शशिकांत जाधव (सोलापूर ) , जयश्री वाघ (नाशिक) अजय देशपांडे (अमरावती ) किरण भावसार (नाशिक )डॉ.मच्छिंद्र नागरे (करमाळा ) डॉ . संजय गायकवाड ( औरंगाबाद ) यांना साहित्य गौरव तर संदीप पाटील (अंबरनाथ ) बाळू नेहे ( ठाणे ) अरुण अंगुले ( नळदुर्ग ) विक्रम पाचंगे ( उमरगा )यशवंत पवार (जळगाव ) यांना महाराष्ट्र शिक्षक भूषण पुरस्कार तर कोरोनायोद्धा विजय काका जाधव (उमरगा )महाराष्ट्र समाज गौरव पुरस्कार बालाजी अंबादास नायकल , (उस्मानाबाद )व जतनसिंह मेहता ( इचलकरंजी ) यांना महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार , महाराष्ट्र क्रीडा भूषण पुरस्कार तालुका क्रीडाधिकारी अर्जुन पुरस्कार प्राप्त सारिका काळे (तुळजापूर )महाराष्ट्र युवा उद्योजक पुरस्कार सचिन धरणे ( नळदुर्ग ) महाराष्ट्र युवा गौरव अॅड.रामचंद्र ढवळे आदींना देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ कानडे यांनी दिली . या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने सचिव चंद्रकांत कांबळे करण्यात आले आहे.