काटी, दि . १५

कोकद (उज्बेकिस्तान) येथे  आयोजित करण्यात आलेल्या बेल्ट रेसलिंग वर्ल्ड चॅपियनशिप स्पर्धेत पुणे येथे स्थायिक असलेली मुळची तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी)ची कन्या  कु.समृध्दी जयदेव म्हमाणे हिची भारतीय संघात ४४ किलो वजन गटात निवड झाली आहे. 


समृध्दी हिने आजपर्यंत अनेक जिल्ह, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळवली आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडू जयदेव घनःश्याम म्हमाणे यांची ती कन्या असून शहरात सर्वत्र 'दंगल गर्ल' अशी तिची ओळख आहे. बेल्ट रेसलिंग खेळांचे धडे घरातूनच मिळाले असून  ती सध्या पिंपरी चिंचवड ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशन या संस्थेत सराव करत आहे. कु. समृद्धी म्हमाणे हिची जागतिक बेल्ट रेसलिंग स्पर्धेत निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
 
Top