नळदुर्ग, दि . १७


 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन उस्मानाबाद   मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या हस्ते  दि. १७ मे २२ रोजी, इटकळ ता . तुळजापूर येथील  युवक व नागरीकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहिर प्रवेश केला .
  

 इटकळ ता . तुळजापूर येथील युवक शेखर लोहार, वैभव बागल, अभिजीत लकडे, ओंकार पांढरकर, पवन महाबोले, हर्षदीप सुरवसे, विनायक लोहार, अमोल बंडगर, रंगनाथ गायकवाड, मयुर लकडे, अजय लकडे, महेश लोहार, संतोश बंडगर, बिरुदेव व्हनमाने, सूरज महाबोले यांचेसह सुरेश लकडे, सलिम खडके, सर्जेराव सावंत, बसु शिंदे, शिवाजी सावंत, राम लकडे या जेष्ठ नागरीकांनी प्रशांत नवगिरे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहिर प्रवेश केला . नवगिरे यांनी सर्वांच्या गळ्यात पुष्पहार घालून स्वागत केले . यावेळी मनसेचे जळकोट शाखाध्यक्ष अजय डांबरे, विठ्ठल बनसोडे, आकाश पटणे, मारुती गायकवाड यांचेसह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
 
Top