जळकोट, दि.६

 ईटकूर येथील सुरेश गोरोबा सावंत यांचे वयाच्या ४० व्या वर्षी ऱ्हदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने त्यांची पत्नी , दोन मुले कुटुंबीय उघड्यावर आले होते . त्यांना कुठलीही एक रुपयाची तोशिस लागू न देता प्रशासन स्तरावर लागणारी सर्व कागदपत्रांची पूर्तता भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण  शिंदे - पाटील आणि भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रदिप  फरताडे यांनी पाठपूरावा करून श्रीमती चंद्रकला सुरेश  सावंत यांना प्रशासन स्तरावरील अर्थसहाय्य कुटुंब योजनेची २० हजार रुपयेची मदत मिळून देण्याकामी सहकार्य केले .



हा मदतीचा धनादेश कळंब तहसिलदार मुस्तफा कोंदे यांच्या हस्ते लक्ष्मण शिंदे - पाटील , प्रदिप  फरताडे ,  संभाजी गिड्डे  , गोविंद आडसुळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीमती चंद्रकला  सावंत यांना धनादेश सुपुर्द करण्यात आला .

          शब्दपूर्ती 

कै . सुरेश गोरोबा सावंत यांच्या निधनानंतर सावंत कुटुंबिय उघड्यावर आले होते . सावंत यांच्या अस्थिविसर्जना दिवशी समाजातील माजी सेवानिवृत्त राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक तुकाराम शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून सावंत कुटुंबियासाठी कोण कोण काय काय सहकार्य करणार असा सर्वासमोर प्रश्न उपस्थित केला व लक्ष्मण  शिंदे - पाटील यांच्यावर अर्थसहाय्य कुटुंब योजना व श्रावणबाळ पेन्शन योजनाची जबाबदारी देण्यात आली होती आणि शिंदे  त्यांच्या एका मुलाची वस्तीगृहातुन शैक्षणिक जबाबदारी घेतली होती. परंतु कोरोनामुळे ते अद्याप शक्य झालेले नाही . परंतु आज रोजी सावंत कुटुंबीयांना देण्यात आलेल्या धनादेशामुळे शब्दपूर्ती झाली .
 
Top