मुरूम, दि . ०६

  समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी  मुरूम येथे महात्मा बसवेश्वर युवक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले.
  

 मुरूम येथील महात्मा बसवेश्वर युवक मंडळाच्या वतीने बसव जयंतीनिमित्त दरवर्षी रक्तदान शिबीर घेण्यात येते.मंडळाच्या पुढाकारातून यावर्षी शहरातील माहेश्वरी सांस्कृतिक भवन येथे गुरुवारी (दि 5) रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.जयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून या रक्तदान शिबिरात मुरूमसह परिसरातील बेळम,केसर जवळगा येथील युवकांनी रक्तदान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.या शिबिरात 125 रक्तदात्यांनी रक्तदान केले.महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांनी रक्तदान शिबिराला भेट दिली.यावेळी चेअरमन दत्ता चटगे,रविंद्र कारभारी,महालिंग बाबशेट्टी,योगेश राठोड आदी उपस्थित होते.


  रक्तदान शिबिरासाठी मंडळाचे अध्यक्ष विलास वाडीकर,उपाध्यक्ष शिवा दुर्गे,सचिव राजकुमार वाले,माजी अध्यक्ष दत्ता हुळमजगे,रविकिरण अंबुसे,जगदीश निंबर्गे,बादल गव्हाने,भगत माळी,प्रताप गिरीबा,देवराज संगुळगे,सिद्धलिंग अंबुसे,राजकुमार लामजने,खंडू सरसंबे,शेखर विभूते,विनायक भोसगे,रविराज गुंडगोळे,ओंकार पाटील आदींनी पुढाकार घेतला होता.सर्व रक्तदात्यांचे आभार मानत मंडळाच्या वतीने रक्तदात्यांना नामवंत कंपनीचे गॉगल भेट देण्यात आले.
 
Top