नळदुर्ग ,दि . २८
येथील पञकार आयुब शेख यांना यंदाचा राज्यस्तरीय शोध पत्रकारिता पुरस्काराने पत्रकार आयुब शेख याना प्रदान करण्यात आला.
त्यांनी पञकारीता क्षेञात सामाजीक, शैक्षणिक,राजकिय,क्रिडा अशा विविध क्षेञात ऊल्लेखनिय कार्य केल्याची दखल घेवुन एन टि.व्ही न्युज वृत्तवाहीनीच्या वर्धापनदिनी मुख्य संपादक ईकबाल , आमदार निलेश लंके, अहमदनगरचे आमदार सग्राम जगताप,जेष्ठ पञकार नंदकुमार आदी मान्यवरांच्या हस्ते शेख यांना यंदाचा राज्यस्तरिय शोध पत्रकारिता पुरस्कार'देण्यात आला आहे.
सदैव सामाजिक कार्याची कास धरुन तळागाळातील लोकांसाठी समाजपयोगी कार्य करणारे तसेच पञकारीतेच्या माध्यमातुन विविध क्षेञात ऊल्लेखनिय कार्य करुन जनमानसात ठसा ऊमटवणारे युवा पञकार आयुब शेख यांना विविध स्तरातुन याआधीही गौरवण्यात आले असुन त्यांना सामाजीक कार्य आणि ऊत्कृष्ट पञकारेतेसाठी राज्यस्तरीय यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
यासोबतच विविध क्षेञातील ऊल्लेखनिय कार्याबद्दल अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. अयुब शेख यांनी निराधार बालकांना मदत मिळवुन देण्यासाठी पुढाकार घेवुन जिल्ह्यातील निराधारांच्या समस्या शासनदरबारी मांडुन अनेकांना न्याय मिळवुन दिला आहे.
अल्पकाळात पञकारीता क्षेञामध्ये आपले नावलौकीक करत अनेक समस्यांना वाचा फोडली आणी शासनदरबारी न्याय मिळवुन दिला.सामाजीक,राजकीय,क्रीया,शैक्षणिक,सास्कृतिक,निसर्ग पर्यावरणाविषयी ऊल्लेखनिय कार्य आणी लिखान तसेच लोकोपयोगी अशा विविध क्षेञात स्वतः पुढाकार घेवुन तसेच बातमीदारीतुनही आपली चुणुक दाखवुन ऊल्लेखनिय कार्य केले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शेख यांचे सर्वञ आभिनंदन होत आहे.