काटी, दि.२७

तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव (काटी ) रस्त्यावर मोहळ तालुक्यातील दादपुर येथील तरुणाचे सापडलेले कागद पत्रासह पैशाचे पाकीट त्या तरुणाला परत देण्यात आले .


गुरुवारी वडगाव (काटी) रस्त्यावर तामलवाडी येथील संभाजी मोरे याना काळ्या रंगाचे पाकीट सापडले. त्यानी ते पाकीट घेवुन  तामलवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. सापडलेले पाकीट ठाणे  अमलदार रहीमपाशा मुलानी यांच्या स्वाधिन केले. पाकीट उघडुन तपासणी केली  असता पाकीटात रोख 1300 रुपये, आधार कार्ड मोटार लायसन् पॅन कार्ड असे कागदपञ भागवत तानाजी माने रा दादपुर ता मोहोळ येथील तरुणांचे असल्याचे उघड झाले. रहिमपाशा मुलानी, शिवाजी शिरसट, आडसुळ आदी पोलीसानी त्या तरुणाचा मोबाईल वरून संपर्क साधत त्यास पाकीट सापडले आहे. पोलीस ठाण्यात येण्याचे कळवले. सदरील तरुण दोन तासात पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यास हरवलेले पाकीट पैशासह सपोनि सचिन पंडीत यांचे हस्ते सुपुर्त केले.
 
Top