महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून नळदुर्ग येथिल श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याने पुढील वर्षी म्हणजे 22-23 गाळप हंगामासाठी ऊसतोडणी व वाहतूक कराराचा शुभारंभ दि. १ मे रोजी करण्यात आला.
श्री तुळजाभवानी कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण यांनी पुढाकार घेऊन अत्यन्त प्रतिकूल परिस्थिती मध्ये यावर्षी गोकुळ शुगरच्या मदतीने दहा वर्ष बंद असलेला हा कारखाना चालू करून परिसरातील जवळपास 40 हजार टन उसाचे गाळप करून चाचणी हंगाम यशस्वी केला. पुढील वर्षाच्या ऊस गाळप हंगामासाठी आता पासूनच तयारी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून कामगार दिनाचे औचित्य साधून आपल्याच परिसरातील वाहतूक कंत्राटदार व ऊस तोडणी कामगार यांचा सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी गोकुळ शुगर इंडस्ट्रिजचे चेअरमन दत्ता शिंदे, तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण, कार्यकारी संचालक विकास भोसले,गोकुळचे जी.एम.प्रदीप पवार, ऊस पुरवठा अधिकारी जी. एस. पटेल, व शेतकी विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदार लक्ष्मण पवार, मार्कंड शिंगाडे, सुरेश राठोड, तिप्पांना कबाडे,लक्ष्मण बांगर, जितू चंदिले, सुशील चौधरी, व इतर वाहतूक ठेकेदार यांच्या बरोबर हा सामंजस्य करार करण्यात आला
राज्याचे"माजी मंत्री मा. मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली,तुळजाभवानी गोकुळ च्या सहकार्याने पुढील हंगामात पूर्ण क्षमतेने चालू होणार असून, तुळजापूर तालुक्यात असणारा जवळपास 11 लाख टन ऊस, त्या पैकी जास्तीत जास्त उसाचे गाळप पुढील गळीत हंगामात,करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, या मधल्या काळात कारखाना अद्यावत करून शेतकऱ्यांच्या हितासाठी, हा कारखाना परत एकदा सज्ज करण्याचा मानस आहे ऊस उत्पादक शेतकरी, व वाहतूक तोडणी कामगारांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन सुनील चव्हाण यांनी या प्रसंगी केले"