तुळजापूर,दि.३:
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालयात संत बसवेश्वर महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी प्रा.धनंजय लोंढे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना प्रा.लोंढे म्हणाले की,संत बसवेश्वर महाराज हे समतेचे पुरस्कर्ते होते, समाजातील अंधश्रद्धा, वाईट चालीरिती नष्ट करण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे, जातिभेद निर्मूलन करण्यासाठी आणि समाजात समतेचे विचार रुजविण्यासाठी त्यांनी खुप मोठे कार्य केले आहे.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा व्ही एच चव्हाण यांच्या सह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.