तुळजापूर दि ३
तुळजापूर येथील सौ. अश्विनी अनंत कोंडो यांनी गीतापरिवार पुणे यांच्याकडून घेण्यात आलेल्या फेब्रुवारी २०२२ गीतावेती प्रमाणपत्र पदवी ५०४ गुण मिळवून उत्तीर्ण केली. या यशाबद्दल संस्थचे प्रमुख स्वामी गोविंददेव गिरी यांनी त्यांचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले आहे.
तुळजापूर तीर्थक्षेत्र येथे मागील दहा वर्षापासून गीता परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील महिलांना श्री भगवद्गीता शिकवण्याचे कार्य करणाऱ्या भगवद्गीता अभ्यासक सौ अश्विनी अनंत कोंडो यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये पार पडलेल्या गीतावृती प्रमाणपत्र परीक्षेत ६०० पैकी ५०४ गुण संपादन केले. भगवत गीतेचे अठरा अध्याय च्या अनुषंगाने ही महत्त्वाची परीक्षा राज्यभरातील अभ्यासकांकडून घेतली जाते त्यामध्ये तुळजापूर येथील सौ अश्विनी कोंडो यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आपण अत्यंत निरपेक्षपणे मोफत भगवद्गीता शिकवण्याचे कार्य अनेक वर्षापासून करत आहोत भगवद्गीतेच्या माध्यमातून मिळणारे ज्ञान अनमोल आहे गीता परिवाराकडून ही पदवी संपादन झाल्यानंतर मनाला मनस्वी आनंद झालेला आहे स्थानिक लोकांना माझ्या ज्ञानाचा उपयोग यापुढील काळात निश्चित होईल अशी प्रतिक्रिया गीता अभ्यासक सौ अश्विनी कोंडो यांनी यानिमित्ताने दिली.