नळदुर्ग ,दि . २५ :   


अलियाबाद  ता .तुळजापूर येथिल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सतत कार्यरत असणारे, सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे विलास राठोड  यांची  जिल्हा चिटणीस,भारतीय जनता पार्टीचे नियुक्ती पत्रक नितीन काळे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी,  यांच्या वतीने देण्यात आले.

तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भारतीय जनता पक्ष वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे विलास राठोड यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल तुळजापूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.


यावेळी व्यंकटराव गुंड,संतोष बोबडे,दीपक अलुरे, गणेश सोनटक्के,नारायण नन्नवरे,विजय देशमुख,प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top