काटी ,दि . २४: उमाजी गायकवाड
तुळजापुर पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शिदे यांच्या वतीने दि. 26 एप्रिल ते 2 मे या कालावधीत घेण्यात आलेल्या नेत्ररोग शिबीरात 713 नेत्र रुग्णांची तपासणी होवुन 90 रुग्ण मोतीबिंदूचे आढळले. त्यापैकी 51 रुग्णावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुणे येथे करुन रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे.
तामलवाडी पंचायत समिती गणातील सुरतगाव तामलवाडी सांगवी पिंपळा बु पिंपळा खुर्द देवकुरुळी या गावात दत्तात्रय शिंदे यानी नेत्र रोग तपासणी शिबीर आयोजित करून वृद्धाना दिलासा दिला होता. एकुण 713 जणाची तपासणी करण्यात आली होती. या शिबिरात 90 जण मोतीबिंदू रुग्ण आढळले होते. त्यापैकी 51 रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया पार पडली आहे.
यासाठी डॉ रविकांत गुरव , माजी उपसरपंच विठ्ठलं गुंड, सिताराम पाटील, विजय जाधव, हणमंत जाधव, अण्णासाहेब जाधव, लखन कदम यांचे सहकार्य लाभले.