चिवरी , दि . ०२
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महात्मा बसवेश्वर जन्म उत्सव समितची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी अनिल बिराजदार, उपाध्यक्षपदी विठ्ठल होगाडे, तर सचिवपदी अजित झिंगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
समिती कार्यकारणीची बैठक तंटामुक्ती अध्यक्ष बलभीम मनशेट्टी, सचिन बिराजदार , शंकर बिराजदार, तानाजी पाटील, चंद्रकांत झिंगरे यांच्या अध्यक्षतेखाली हनुमान मंदिरामध्ये घेण्यात आली. उर्वरित कार्यकारणीत सहसचिव सचिन बिराजदार कोषाध्यक्ष विनोद पाटील खजिनदार अतुल पाटील, यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भीमाशंकर भुजबळ, शिवराज भुजबळ, स्वागत बिराजदार, अजित राजमाने, सुरज बिराजदार,चेतन बिराजदार, सोम काळजाते आदीसह बसवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होत.
तसेच दि,३ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.