नळदुर्ग , दि . ०२

 तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण  महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील जिवशास्त्र  विषयाचे प्रा. विवेकानंद रामचंद्र कुंभार यांना स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तर्फे नुकतीच पी. एचडी. देण्यात आली आहे. 

त्यांना बालाघाट शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग  येथील वनस्पती विभागातील मार्गदर्शक  प्रा डॉ. उद्धव भाले यांचे  विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा.डॉ. चंद्रशेखर स्वामी, दयानंद सायन्स महाविद्यालय लातुर हे त्यांचे संशोधन मार्गदर्शक आहेत. कुंभार यांनी  " स्टडीज ऑन इकोफ्रेंडली अप्रोचेस फॉर द इंटिग्रेटेड मॅनेजमेंट   ऑफ  फंगल डिसीजेस ऑफ ओनियन (अलियम सेफा)" या विषयावर संशोधन पूर्ण केले आहे. 


या शेतीविषयक असणाऱ्या संशोधनातून त्यानी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून कांद्यावर पडणाऱ्या घातक बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठीचे सखोल असे संशोधन केले आहे. बुरशीनाशकाशिवाय आपल्या शेतीच्या आजूबाजूला काही जंगली वनस्पतीसुद्धा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळू शकतात आणि उत्पादन क्षमता सुद्धा वाढविली जाऊ शकते. शिवाय जमिनीतील सुक्ष परजीवी बुरशी ( ट्रायकोडरमा हारजीयानम) ही बुरशीनाशक म्हणून काम करते व अन्नधान्य पुरविणाऱ्या पिकाना  सेंद्रिययुक्त उपयुक्तता निर्माण करते व त्यामुळे पिकाची वाढ हाेऊन उत्पादन क्षमता वाढण्यास कशाप्रकारची मदत होऊ शकते, अशाप्रकारचे शेतकऱ्यांना उपयोगात येणारे संशोधन पूर्ण केले आहे. प्रा.डॉ.यु. एन. भाले यांच्याकडे अशाप्रकारचे सातत्याने संशोधन केले जात आहे. त्यामुळे त्यांचे व कुंभार 
 यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
 
Top