जळकोट, दि.२  : मेघराज किलजे    


तुळजापूर तालुक्यातील  जळकोट परिसरातील आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मानमोडी शाळेचे मुख्याध्यापक  विक्रम पाचंगे यांना तालुका शिक्षक समितीच्यावतीने विशेष कार्य सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  


पाचंगे यांनी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले, शाळा डिजिटल करणे ,शाळेस आयएसओ मानांकन प्राप्त करून देणे, स्पर्धा परीक्षांचे आयोजन करणे,  आदर्श महिलांचा सन्मान करणे, शाळेमध्ये भाजीपाला लागवड करणे, विविध शालोपयोगी उपक्रम राबवून विद्यार्थी गुणवत्ताधारक बनवणे,विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर लाठी स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी घडवले आहेत. या कार्याची दखल घेऊन तालुका शिक्षक समिती शाखा, तुळजापूरच्या वतीने सन्मान कर्तृत्वाचा विकास जिल्ह्याचा कार्यक्रमाअंतर्गत विक्रम पाचंगे यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. 


यावेळी शिक्षक व कर्मचारी वर्ग यांचा सन्मान करण्यात आला . यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  जाधव  ,जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, तुळजापूरचे गटशिक्षणाधिकारी  अर्जुन जाधव   ,  कल्याण  बेताळे , विलास कंटेकुरे ,राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त  उमेश खोसे, विलास तोरसल्ले , बिलाल  सौदागर व समितीचे अनेक पदाधिकारी तसेच सन्मानमूर्ती मोठ्या संख्येने  उपस्थित होते .याचबरोबर विविध संघटनांचे पदाधिकारी  यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
Top