जळकोट,दि२ : मेघराज किलजे 

  किर्तनातून समाजप्रबोधन करणारे थोर कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे १० मे (मंगळवार) रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत खुदावाडी (ता तुळजापूर) येथे   कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .


सदन शेतकरी कै .सोपान नागा नरवडे (पट्टे ) द्राक्ष बागायतदार यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . या किर्तन सोहळ्यात काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


  सध्या येथील मैदानात या किर्तन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू केली असून खुदावाडी ग्रामस्थांच्या व नरवडे परिवारांच्यावतीने निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या स्वागताचे डिजिटल बॅनर लावले जात आहेत. 


इंदुरीकर महाराज किर्तन सोहळ्यासाठी खुदावाडीत येणार असल्याने खुदावाडी , अणदुर , इटकळ , नळदुर्ग,वागदरीसह परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने दाखल होणार यासाठी आयोजकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.
  तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या किर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन नागनाथ सोपान नरवडे (पट्टे) यांनी केले आहे .
 
Top